मोबाईल क्रांतीनंतर देशात डिजिटल क्रांती आली. त्यामुळे जग अगदी जवळ आले. व्यवहारात तर या डिजिटल क्रांतीचा मोठा वाटा राहिला. बँकिंगची रटाळ आणि वेळखाऊ प्रक्रियेला जणू बुस्टर डोस मिळाला. आता ग्राहकांना व्यवहार करण्यासाठी वारंवार बँकेत जाण्याची गरज उरली नाही. त्याच्या एटीएमच्या चकराही कमी झाल्या आहेत. ऑनलाइन पेमेंट मोडच्या (Online Payment Mode) वापरामुळे हे शक्य झाले आहे. डिजिटल पेमेंटचे देशात प्रचंड पीक आले आहे. गल्लीबोळातील भाजी विक्रेत्यापासून ते मोठ-मोठ्या दुकान, हॉटेलमध्ये या डिजिटल पेमेंटमुळे झटपट व्यवहार सुरु झाले. पण UPI पेमेंटसाठी आता तुमचा खिसा खाली होईल. गुगल पे (Google Pay), फोन पे (Phone Pay) आणि पेटीएम (Paytm) सारख्या डिजिटल माध्यमांद्वारे 2,000 रुपयांपेक्षा अधिकचा व्यवहार केल्यास 1 एप्रिलपासून शुल्क लागणार आहे.
शुल्काची अधिसूचना
भारतीय राष्ट्रीय देयके मंडळाने (NPCI) एक अधिसूचना काढली आहे. त्यानुसार, युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजे
UPI च्या
माध्यमातून मर्चंट ट्रान्झॅक्शनवर प्रीपेड पेमेंट इंस्ट्रमेंट्स (PPI) शुल्क आकारण्याची सूचना केल आहे.
अधिसूचनेनुसार, 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कमेच्या UPI व्यवहारांवर 1.1 टक्के शुल्क द्यावे लागेल. हे
शुल्क मर्चंट ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यापाऱ्यांना पेमेंट करणाऱ्या युझर्सकडून वसूल
करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment