Saturday, March 25, 2023

राहुल गांधींची खासदारकी रद्द, वाचा सर्वात मोठी बातमी

 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळं देशाच्या राजकारणात वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची लोकसभा सचिवालयाने अधिसूचना जारी केली आहे. 




  • राहुल गांधी हे केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. लोकसभा सचिवालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 23 मार्च 2023 पासून कलम 102(1)(ई) च्या तरतुदींनुसार त्यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आलं आहे. लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 8 चा आधार या निर्णयासाठी घेण्यात आला आहे.

  •  गुजरातमधील सुरत न्यायालयाने एका वक्तव्यामुळे दाखल झालेल्या मानहानी खटल्यात राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. सुरत न्यायालयाने त्यांना काल (23 मार्च) दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. 

नेमकं प्रकरण काय?


2019 च्या निवडणुकीच्या वेळी कर्नाटकातील एका प्रचारसभेत राहुल गांधी यांनी देशातून पळून गेलेल्या आरोपींबद्दल बोलताना मोदी आडनावाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. बँकांचे हजारो कोटी रुपये थकवून विदेशात पळालेले नीरव मोदी, ललित मोदी यांच्याबद्दल ते वक्तव्य होतं. यावेळी त्यांचा रोख अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं होता. त्यांच्या याच वक्तव्यास आक्षेप घेत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. 


No comments:

Post a Comment