सामाजिक भान
समाजामध्ये ,गावामध्ये आपण वावरत असताना सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य या मधला अंतर आजच्या तरुण युवकांनी लक्षात घेतला पाहिजे!
सामाजिक कार्य करत असताना कुठल्याही प्रकारचा भेद भाव न करता गावातील जेष्ठ ,प्रतिष्ठित ,लहान थोर मंडळी तसेच माताभगिनीं यांचा सहभाग महत्वाचा असतो कारण सामाजिक कार्याला शोभा येण्यासाठी एका दोघांच्या उपस्थिती मध्ये शक्य नसतं त्यासाठी हावी असते ती म्हणजे सामाजिक एकी जर गावामध्ये एखादा कार्यक्रम असेल आणि त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ,प्रमुख उपस्थिती ,कार्यक्रमाचे अध्यक्ष नसतील तर सामाजिक कार्यक्रम योग्य प्रकारे होईल का नाही, याची खात्री नसते.प्रथम कार्यक्रमाची रूपरेषा तयार रहायला हवी जेणेकरून कार्यक्रम चांगल्यापद्धतीने कशा प्रकारे होईल.
या गोष्टींवर लक्ष देणं योग्य असेल .गावाकडील लोकांची मानसिकता ही काळाच्या ओघात बदलत चाललेली दिसत असताना आपणास पदोपदी पहावयास मिळत आहे. सामाजिक वारसा आपल्या सर्वाना आपल्या पूर्वजांकडून वर्षानुवर्षे लाभला असून ते जपणं हि तितकच महत्वाचं आहे.सामाजिक कार्यची उणीव समाजाला व युवा नेतृत्वाला महत्वाची आहे कारण या सामाजिक कार्यामधून त्याची व्याप्ती ही महत्वाची असून त्याचा प्रभाव आणि कार्य याची एक वेगळी ओळख निर्माण होण्यास पात्र होत असते.
राजकारण
गावातील राजकारण हे दिल्लीच्या राजकारणापेक्षा काही कमी नसते. कारण इथे प्रत्येक पुढारी एकमेकांच्या कुरापती, गटातटाचे राजकारण आणि पाय ओढण्याचं काम चांगल्या प्रकारे करत असताना आपण पहात असतो. जर एखादा युवा पुढारी त्याच्या जण संपर्कातून,जनतेच्या समस्यांना महत्व देऊन जर कार्य करत राहिला तर नक्कीच जनसामान्य जनता त्यांच्या कामाचा आणि त्यांची जनतेशी असलेली आदराची भावना हि कायम प्रेरणा देण्याचं काम करत असते..एखादा पुढारी यशस्वी होईल का नाही,याची शाश्वती सांगता येत नसते. कारण अनेक पुढारी मोठेपणाच्या ओघात निष्फळ आणि चुकीच्या धोरणांमुळे सक्रिय राहू शकत नाहीत . याचा परिणाम त्यांच्या थेट राजकीय अस्तित्वावर होत असतो. युवा पुढारी तोच होईल जो कामाशी आणि जनतेशी प्रामाणिकपणे बांधील राहून धोरणात्मक बाबी लक्षात घेऊन गावचा आणि देशाचा विकास कश्याप्रकारे साधता येईल अश्या दृष्टीचा राजकारणी युवा पुढारी हवा.
No comments:
Post a Comment